'सैराट'च्या यशात आणखी एक आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा

'झी स्टुडिओ'ची निर्मिती आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'चा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही बोलबाला वाढू लागलाय. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स मॅगझीनने 'सैराट'च्या यशाची दखल घेतली आहे. 

Updated: May 13, 2016, 08:07 PM IST
'सैराट'च्या यशात आणखी एक आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा title=

मुंबई : 'झी स्टुडिओ'ची निर्मिती आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'चा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही बोलबाला वाढू लागलाय. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स मॅगझीनने 'सैराट'च्या यशाची दखल घेतली आहे. 

'सैराट'ने मराठी फिल्म इंडस्ट्रीत सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड केलाय. नटसम्राट, लय भारी, टाईमपास टू, कट्यार काळजात घुसली या सिनेमांना मागे टाकत 'सैराट'ने १२ दिवसांत ४४ कोटींचा गल्ला मजवत बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड नोंदवला आहे. 

दरम्यान, सैराटची घोडदौड पाहता 'सैराट' आता शंभर कोटींची भरारी घेणार का याचीच आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.