पडद्यावरच्या हिरोंना रिअल हिरोंची भुरळ

पडद्यावरच्या हिरोंना सध्या रिअल लाईफमधल्या हिरोंची भुरळ पडू लागलीय. मिस्टर परफेक्शनिस्टचा दंगलमधला रेसलर लूक असेल किंवा सलमानचा 'सुलतान'मधला पैलवानी लूक... हे रिअल लाईफमधली कॅरेक्टर प्ले करताना पडद्यावरचे हे हिरो सध्या चांगलीच मेहनत घेऊ लागलेत.  

Updated: Apr 13, 2016, 10:36 AM IST
पडद्यावरच्या हिरोंना रिअल हिरोंची भुरळ title=

मुंबई : पडद्यावरच्या हिरोंना सध्या रिअल लाईफमधल्या हिरोंची भुरळ पडू लागलीय. मिस्टर परफेक्शनिस्टचा दंगलमधला रेसलर लूक असेल किंवा सलमानचा 'सुलतान'मधला पैलवानी लूक... हे रिअल लाईफमधली कॅरेक्टर प्ले करताना पडद्यावरचे हे हिरो सध्या चांगलीच मेहनत घेऊ लागलेत.  

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख केलेल्या आमिर खानने दंगलमधील आपल्या भूमिकेसाठी तब्बल १५ किलो वजन वाढवलं आणि नंतर ते जिद्दीने कमीही करून दाखवलं. आपल्या प्रत्येक भूमिकेत जान आणण्यासाठी आमिर नेहमीच सर्वोतोपरी प्रयत्न करतो. दंगलसाठी आमिरने जीममध्ये अशीच जीवतोड मेहनत केलीय. तर दुसरीकडे सलमानही सुलतानमधला आपला हटके अंदाज दाखविण्यासाठी सज्ज आहे. सुल्तानमध्ये कुस्तीपटूच्या रोलमध्ये सलमान पुन्हा एकदा पडद्यावर आपली दबंगिरी दाखविण्यास भलताच उत्सुक आहे. 

सलमान आणि आमिरपाठोपाठ बॉलिवूडचा किंग खान तरी कसा मागे राहिल. किंग खानने रियल लाईफ कॅरेक्टर प्ले करत फॅनमधून डबल धमाका पेश केलाय. शाहरुखचा हा डबल रोल पाहून प्रेक्षकही कदाचित गोंधळून जातील की दोन्ही भूमिका शाहरुखनेच केल्यात की शाहरुखचा डमी वापरलाय. मात्र, दोन्ही रोलमध्ये स्वतः शाहरुखच आहे. हॉलिवूडच्या मेकअपमनने केलेली ही कमाल पाहताना शाहरुखचे चाहतेही नक्कीच खूश होतील.

फक्त खान मंडळीच आपल्या रोलसाठी मेहनत करतात, असं नाही. नव्या दमाचा टायगर श्रॉफ बागीमधून मार्शल आर्टची आपली खूबी दाखवणार आहे. शाहिद कपूरच्या 'उडता पंजाब'मधल्या लेटेस्ट रॉकस्टार लूकने तर त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढलीय तर आगामी सरबजीत फिल्ममधून रणदीप हुडाच्या लूकने सगळेच चकीत झालेत. 

या रिल लाईफ हिरोंचा हा नवा अंदाज पाहून असंच म्हणावं लागेल की रिअल लाईफमधल्या हिरोंची यांना भुरळ पडलीये खरी. आता हा त्यांचा फंडा प्रेक्षकांना कसा वाटतो, हे लवकरच कळेल..