फिल्म रिव्ह्यू : हम्प्टी शर्मा की दुल्हनिया

निर्माता करन जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणारी आलिया भट्ट आणि वरुण धवन ही जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून द्यायला सज्ज झालीय.

Updated: Jul 11, 2014, 04:38 PM IST
फिल्म रिव्ह्यू : हम्प्टी शर्मा की दुल्हनिया title=

सिनेमा : हम्प्टी शर्मा की दुल्हनिया
दिग्दर्शन : शशांक खैतान
निर्माता : करण जोहर
कलाकार : वरुण धवन, आलिया भट, आशुतोष राणा, सिद्धार्थ शुक्ला

निर्माता करन जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणारी आलिया भट्ट आणि वरुण धवन ही जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून द्यायला सज्ज झालीय. या जोडीचा ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आज बॉक्स ऑफिसवर धडकलाय. करन जोहरच्या इतर सिनेमांप्रमाणेच ही कथाही एका लव्ह स्टोरीवर आधारलेली आहे. 

काय आहे सिनेमाचं कथानक
काव्या प्रताप सिंह (आलिया भट्ट) आणि हम्प्टी शर्मा (वरुण धवन) यांची ही लव्ह स्टोरी... पंजाब शहरातील अंबालामध्ये राहणारी काव्या एक बिनधास्त अंदाजामध्ये पाहायला मिळते... तिला जे हवंय ते तिला हवयंच.. काव्या आपल्या वडिलांच्या पसंतीच्या एका तरुणाशी लग्न करण्यासाठी आपली संमती देते. लग्नाच्या खरेदीसाठी ती दिल्लीला जाते अन् तिथे तिला भेटतो हा हम्प्टी शर्मा... ऊर्फ राकेश... 

कॉलेज बॉय असलेला हम्प्टी पहिल्याच भेटीत काव्याच्या प्रेमात वेडा होऊन जातो. आपल्या मित्रांच्या मदतीनं तो काव्याची माहिती काढतो आणि तिच्या एका फ्रेंडच्या लग्नात धडकतो. याच लग्नसोहळ्या दरम्यान तो काव्याला पटवतोही... 
मात्र, काव्या आपल्या शहरात परतते तेव्हा मात्र कथेत ट्विस्ट येतो. आपल्या वडिलांना आपल्या भावना समजणार नाहीत असं तिला वाटतं. हम्प्टी मात्र काव्याच्या कुटुंबीयांना पटविण्याच्या मागे लागतो... मग, शेवटी काव्या आणि हम्प्टी एकत्र येतात किंवा नाही? कसे? हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.  

अभिनय
आलिया आणि वरुण आपल्या भूमिकेत चपखल बसलेले दिसतात. बबली, पंजाबी कुडी आलियानं मस्तपैंकी उभी केलीय. हम्प्टी शर्माचा भाऊ बनलेल्या वरुणनंही आपल्या भूमिकेत कसर बाकी ठेवली नाहीय. सिद्धार्थ शुक्लानं परदेशी व्हिलनची भूमिकाही निभावलीय पण, कुठे कुठे तो कमी पडताना जाणवतो. आशुतोष राणाही भाव खाऊन जातो.  

एकूणच काय तर... 
लव्ह, रोमान्स आणि मनोरंजन यांनी पूरपूर भरलेला हा सिनेमा तुमच्या विकेन्डसाठी चांगलाच ऑप्शन ठरू शकतो. शशांक खेताननंही स्वत:ला डायरेक्टर म्हणून आपल्या पहिल्याच सिनेमात सिद्ध केलंय 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.