फिल्म रिव्ह्यू : मांडणीत फसलेला 'रझाकार'

रझाकार... स्वातंत्र्यकाळानंतरची ही गोष्ट... १९४८ साली अनेक संस्थानं स्वतंत्र भारतात विलिन झाली पण हैदराबादचा निझाम मिर उस्मान अली खान हा मात्र हैदराबादच्या विलिनिकरणास तयार नव्हता. 

Updated: Feb 27, 2015, 11:49 PM IST
फिल्म रिव्ह्यू : मांडणीत फसलेला 'रझाकार' title=

 

सिनेमा : रझाकार 
दिग्दर्शक : राज दुर्गे 
कलाकार : सिद्धार्थ जाधव, ज्योती सुभाष, झाकीर हुसैन

मुंबई :  रझाकार... स्वातंत्र्यकाळानंतरची ही गोष्ट... १९४८ साली अनेक संस्थानं स्वतंत्र भारतात विलिन झाली पण हैदराबादचा निझाम मिर उस्मान अली खान हा मात्र हैदराबादच्या विलिनिकरणास तयार नव्हता. त्यावेळी प्रत्यक्षात निझाम युद्धाची तयारी करत होता... या युद्धाचा एक भाग म्हणून रझाकार नावाची संघटना ओळखली जात असे... लष्कराचं प्रतिरुप असलेल्या रझाकारांनी त्या काळी अत्याचाराच्या सगळ्याच परिसीमा ओलांडल्या होत्या... अशा या रझाकांची ही गोष्ट आहे...

कथानक 
रझाकार या सिनेमात खंडगावातल्या गावकऱ्यांची कथा मांडण्यात आली आहे... या गावकऱ्यांवर  रझाकारांचा अत्याचार चालू असताना कशाप्रकारे या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवून हरी आणि काही सत्याग्रही या रझाकारांचा नायनाट करतात.
 
अभिनय  
सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या रझाकारमध्ये त्याच्या वाट्याला आलेली हरीची व्यक्तिरेखा त्यानं चांगली पार पाडली आहे. एक कोंबडी चोर तरुण... आपल्या म्हाताऱ्या आईसोबत राहणारा... या सिनेमातला हरी... अर्थातच सिद्धार्थ जाधवची ही इमेज या आधीही अनेकदा सिनेमा, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे...आणि त्याचीच पुनरावृत्ती रझाकार हा सिनेमा पाहताना कुठेतरी सतत जाणवतं राहतं.
 
झाकीर हुसैन : 
अभिनेता झाकीर हुसैननं साकारलेली मुख्य रझाकार दिलावर खानची भूमिका त्यानं उत्तमरीत्या बजावली आहे... त्याचा लूक आणि स्क्रिनवरचा प्रेसेंस पाहता, त्याच्या त्या व्यक्तिरेखेला एक वेगळंच महत्त्व मिळालंय.
 
दिग्दर्शन : 
राज दुर्गे यांनी रझाकार या सिनेमाचं दिगदर्शन केलं असून, यासिनेमासाठी कथा पटकथा आणि संवादही त्यांनी लिहीले आहेत. 

सिनेमाबद्दल... 
रझाकार हा एक ऐतिहीसिक पार्श्वभूमिवर आधारीत सिनेमा आहे. त्यामुळे त्याचा संपूर्ण अभ्यास करुन त्याची योग्यरित्या मांडणी करणं अपेक्षीत होतं.... सिनेमातला तो अभ्यास जरी दिसला तरी त्याची मांडणी फसलीय.

सिनेमाचा फ्लो, त्याचा होल्ड कुठेही जाणवत नाही... खरंतर सिनेमातली गोष्टच हरवलेली वाटते. अनेक ठिकाणी नको तिथे गाण्यांचा समावेश करण्यात आलाय. तर काही ठिकाणी नको त्या वेळी नको ते सिन्स घालण्यात आलेत... सिनेमाची सुरुवात बरी झाली असली तरी हळूहळू सिनेमा बोअरींग वाटू लागतो.
 
 रझाकार या सिनेमाला आम्ही देतोय 1.5 स्टार्स... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.