रिंकूवर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव

सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली आर्ची अर्थात अभिनेत्री रिकू राजगुरु हिचा आज वाढदिवस आहे. 

Updated: Jun 3, 2016, 10:55 AM IST
रिंकूवर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव title=

मुंबई : सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली आर्ची अर्थात अभिनेत्री रिकू राजगुरु हिचा आज वाढदिवस आहे. 

तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियातून तिच्यावर अक्षरश: शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. सैराट चित्रपटानंतर रिकूच्या फॅनच्या संख्येत जबरदस्त वाढ झालीये.

रिकूंच्या फेसबुकवरील ऑफिशियल पेजसोबतच तिच्या नावाने सुरु कऱण्यात आलेल्या अनेक फेक अकाउंटवरही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातायत.

सैराट चित्रपटाला सध्या जबरदस्त यश मिळतेय. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळवलेय. या चित्रपटातील अभिनयासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय.