'कॉमेडी किंग' पुन्हा वादात, चुकीच्या वक्तव्यावर माफी

कॉमेडी किंग कपिल शर्माचा फिव्हर सध्या थोडा थंडावलेला दिसतोय... हाच कपिल सध्या अनेक वादांतही अडकताना दिसतोय.

Updated: Nov 19, 2014, 10:36 PM IST
'कॉमेडी किंग' पुन्हा वादात, चुकीच्या वक्तव्यावर माफी  title=

नवी दिल्ली : कॉमेडी किंग कपिल शर्माचा फिव्हर सध्या थोडा थंडावलेला दिसतोय... हाच कपिल सध्या अनेक वादांतही अडकताना दिसतोय.

असाच एक वाद पुन्हा निर्माण झाला तो कपिलच्या एका वक्तव्यामुळे...  कपिलनं ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान माऊंट एव्हरेस्ट भारतात असल्याचं वक्तव्य केलं. 

यावर लगेचच प्रतिक्रिया देत अनेक नेपाळी नागरिकांनी आपल्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलंय.

हे लक्षात आल्यानंतर आपल्या वक्तव्यावर कपिलनं माफीही मागितलीय. आपल्या चुकांची जाणीव झाल्यावर कपिलने ट्वीटरवर साऱ्या नेपाळवासीयांची माफी मागितलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.