मेलबर्न : ऑशी कप दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये एका मॉडलनं आपले सगळे कपडे उतरवले आणि ती आपल्या फॅन्ससमोर नाचत राहिली... यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
हीथर मॅक्कर्टनी या मॉडेलनं हा कारनामा करून दाखवलाय... सध्या हीथर इंटरनेटवर ‘सेन्सेशन’ ठरलीय. तिचा हा व्हिडिओ यू ट्यूबवर लाखो यूझर्सनं पाहिलाय.
मॅच सुरु असताना सिडनी स्वान्सनं मॅच जिंकली आणि हीथर आनंदानं बेभान झाली... तिचा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ती नाचत होती... त्यानंतर अचानक तिनं बघता बघता आपले सारे कपडे काढून फेकले... आणि ती तशीच नाचत राहिली. यावेळी ती नशेत होती.
तिला आवरण्यासाठी मग स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांना तिथं यावं लागलं... त्यांनी हीथरला तिथं अटक केली. तिच्यावर १६० डॉलरचा दंड ठोठावण्यात आला.
अल्कोहोलमध्ये मिसळलेल्या औषधांच्य मिश्रणांमुळे नशा चढल्याचं हीथरनं यावर स्पष्टीकरण दिलंय. सोबतच, आपण केलेल्या या कारनाम्याचा तिला अजिबात पश्चाताप नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.