शाहरुखच्या फॅनवर मोगली भारी

शाहरुखच्या फॅनची गाडी बॉक्स ऑफिसवर अडखळत अडखळत चालली आहे. सिनेमाने आतापर्यंत केवळ ८५ कोटींची कमाई केली असून एक आठवडा झाला तरी या सिनेमाला १०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश करता आलेला नाही. त्यामुळे फॅनने किंग खानला जबरदस्त धक्का दिल्याची चर्चा सध्या रंगते आहे. 

Updated: Apr 24, 2016, 08:30 AM IST
शाहरुखच्या फॅनवर मोगली भारी title=

मुंबई : शाहरुखच्या फॅनची गाडी बॉक्स ऑफिसवर अडखळत अडखळत चालली आहे. सिनेमाने आतापर्यंत केवळ ८५ कोटींची कमाई केली असून एक आठवडा झाला तरी या सिनेमाला १०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश करता आलेला नाही. त्यामुळे फॅनने किंग खानला जबरदस्त धक्का दिल्याची चर्चा सध्या रंगते आहे. 

तर दुसरीकडे हॉलिवूडचा 3डी लाइव एनिमेशन सिनेमा द जंगल बुकने आतापर्यंत 145 कोटींची कमाई केली आहे.

सिनेमाने पहिल्याच दिवशी 10.9 करोड, दुस-या दिवशी 13.51 करोड आणि तिस-या दिवशी 16.59 करोड रुपयांचा व्यवसाय केला आहे. 

शाहरुखच्या फॅनवरही मोगली भारी ठरला असून मोगलीच्या चढत्या आलेखाचा फॅनला फटका बसला आहे. विदेशातही जंगलबुकने कमाईचे अनेक रेकॉर्डस तोडले आहेत.