VIDEO : व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी प्रियंका-सिद्धार्थने केला साखरपुडा

बॉलीवूड कलाकारांमध्ये १४ फेब्रुवारीला व्हॅलेटाईन्स डेनिमित्त खास उत्साह पाहायला मिळाला. काही कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा दिल्या. 

Updated: Feb 16, 2017, 07:59 AM IST
VIDEO : व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी प्रियंका-सिद्धार्थने केला साखरपुडा title=

मुंबई : बॉलीवूड कलाकारांमध्ये १४ फेब्रुवारीला व्हॅलेटाईन्स डेनिमित्त खास उत्साह पाहायला मिळाला. काही कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा दिल्या. 

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासाठी यंदाचा व्हॅलेंटाईन्स डे खास ठरला. सिद्धार्थने यावेळी प्रियंकाला व्हॅलेंटाईन्स डेचे निमित्त साधत लग्नासाठी मागणी घातली. मात्र रिअल लाईफमध्ये नव्हे तर रील लाईफमध्ये हे सगळे घडले.

खरतर प्रियंका आणि सिद्धार्थने काही दिवसांपूर्वीच एका जाहिरातीसाठी शूट केले. प्रियंकाने व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी हा व्हिडीओ खास शेअर केला. तसेच भविष्यात सर्व पतींसाठी यात काही प्रपोजल गोल्स आहेत असेही म्हटलेय.

पाहा हा व्हिडीओ