बिपाशा-करणच्या नात्याला घरच्यांचा विरोध

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर यांच्या नातेसंबंधाची चर्चा सध्या बॉलीवूड वर्तुळात सुरु आहे. ते लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. 

Updated: Mar 17, 2016, 01:15 PM IST
बिपाशा-करणच्या नात्याला घरच्यांचा विरोध title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर यांच्या नातेसंबंधाची चर्चा सध्या बॉलीवूड वर्तुळात सुरु आहे. ते लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. 

खासकरुन करणने त्याची आधीची पत्नी जेनिफर विंगेटशी घटस्फोट घेतल्यानंतर बिपाशा आणि करण लवकरच लग्न कऱणार असल्याचे बोलले जात होते. मात्र एका मीडिया रिपोर्टनुसार बिपाशा आणि कऱणचे कुटुंबिय त्यांच्या या नात्याबाबत अथवा लग्नाबाबत खुश नाहीयेत. 

असंही कळतंय की करणच्या आईने त्याला जर बिपाशाशी लग्न केल्यास सर्व संबंध तोडून देईन असं बजावलही आहे. यावरुन करणच्या आईला बिपाशा पसंत नसल्याचे दिसते. बिपाशाबाबतच नव्हे तर जेव्हा करणने जेनिफरशी लग्न केले होते तेव्हाही करणच्या आईचा त्याला विरोध होता. 

तसेच फक्त करणच्या आईचा या नात्याला विरोध नाही तर बिपाशाची आईचाही सुरुवातीला या नात्याला विरोध होता. दोन वेळा घटस्फोट झालेल्या माणसाशी बिपाशाचा विवाह करुन देण्यालाही तिचा विरोध होता. मात्र असंही समजतयं की बिपाशाने आपल्या कुटुंबियांची याबाबत मनधरणी केल्यानंतर ते या नात्याला स्वीकारायला तयार झाले.