नवी दिल्ली : बिग बॉसच्या घरातील स्पर्धक उपेन पटेल आणि करिश्माच्या नव्या लव्ह स्टोरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सीजनमधील स्पर्धक आणि उपेनची मैत्रिण डायंड्राने ट्विटरवर या लव स्टोरीला खोटे म्हटले आहे.
डायंड्राला एका फॅनने विचारले की खरंच करिश्मा आणि उपेन यांचे प्रेम आहे. तर डायंड्राने सांगितले, की इमानदारीने सांगायचे झाले तर मला काहीच आयडीया नाही. या सर्व प्रकरणात मी कन्फ्युज आहे. करिश्मा यापूर्वीच एका नात्यात गुंतलेली आहे.
बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतलेल्या उपेन पटेल याने नेहमी करिश्माप्रती प्रेम दाखवताना दिसला आहे. सोमवारच्या एपिसो़डमध्ये उपेनने करिश्माला प्रपोज केल्यानंतर करिश्माने उपेनला कॅमेऱ्यासमोर किस केले.
घरातील सर्व सदस्य झोपल्यानंतर करिश्माने उपेनला विचारले की तो खऱ्या जीवनात कसे आहे. तेव्हा उपेनने सांगितले की, मला फिरायला खूप आवडते, आपण परदेशात युरोप, पॅरिस, नॉर्वे आणि मयामीला जाऊ. तिसऱ्या दिवशी नव्या जागी जाऊ. आपण मलेशियालाही जाऊ. करिश्माच्या एका प्रश्नावर उपेनने सांगितले की, आपली साथ छोटी असो वा मोठी पण आपण कायम एकत्र राहू...
तुमच्या माहितीसाठी घरातून बाहेर पडलेली सोनाली राऊतशी उपेन फ्लर्ट करीत होता. उपेनने सोनालीला किसही केला होता. एका टास्कमध्ये दोघांचे लग्नही झाले होते.
उपेनच्या या प्रपोजलनंतर करिश्मा आणि तिच्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाले आहे. ब्रेकअपच्या बातम्यांनंतर करिश्माच्या बॉयफ्रेंड ऋषभ चोकसी याला विचारले तेव्हा ऋषभने सांगितेल की, तो करिश्माचा चांगला मित्र आहे आणि आमच्यात तसे काही नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.