बे वॉचच्या ट्रेलरमध्ये प्रियंकाला शोधण्यासाठी लावावा लागतो भिंग

 गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रियंका चोप्राच्या चाहत्यांना प्रतिक्षा होती तो बे वॉच चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला. पण या ट्रेलरमध्ये सर्वत्र रॉक आणि इफ्रॉन दिसत आहे आणि प्रियंकाला शोधण्यासाठी भिंग लावावा लागत आहे. 

Updated: Dec 8, 2016, 09:37 PM IST
बे वॉचच्या ट्रेलरमध्ये प्रियंकाला शोधण्यासाठी लावावा लागतो भिंग  title=

मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रियंका चोप्राच्या चाहत्यांना प्रतिक्षा होती तो बे वॉच चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला. पण या ट्रेलरमध्ये सर्वत्र रॉक आणि इफ्रॉन दिसत आहे आणि प्रियंकाला शोधण्यासाठी भिंग लावावा लागत आहे. 

 

प्रियंका चोप्राचा हॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून बे वॉचची भारतात चर्चा होती. तिच्या या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रसिद्ध करण्यात आला. त्यात ती फक्त काही सेकंदच दिसली आहे. 

भिंग लावून दिसली पण झिंग लावून गेली...

प्रियंका या ट्रेलरमध्ये भिंग लावून दिसली पण ती झिंग लावून गेली. अशी प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.