'बॅटमॅन vs सुपरमॅन'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बॉक्स ऑफिवर होणाऱ्या कमाईच्या रेकॉर्डसबद्दल काय म्हणावं? 

Updated: Mar 27, 2016, 11:19 AM IST
'बॅटमॅन vs सुपरमॅन'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई title=

मुंबई : बॉक्स ऑफिवर होणाऱ्या कमाईच्या रेकॉर्डसबद्दल काय म्हणावं? इथे कोणता चित्रपट किती कमावेल याचं काही खरं नाही. कारण, बघा ना, शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'बॅटमॅन vs सुपरमॅन: द डॉन ऑफ जस्टिस' या चित्रपटाने थोडेथोडके नाही तर तब्बल ५०० कोटी पहिल्याच दिवशी कमावलेत. 

खरं तर या चित्रपटाला समीक्षकांनी काही चांगलं म्हटलेलं नाही. जगभरातल्या समीक्षकांच्या समीक्षणात याविषयी नाराजी वर्तवण्यात आलीये. तरीही जगभरात मात्र बॅटमॅन आणि सुपरमॅन यांच्या चाहत्यांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केलीये. 

बॉस्क ऑफिस मोजो या वेबसाईटच्या आकड्यांनुसार या चित्रपटाने प्रदर्शित झालेल्या दिवशीच ८ कोटी २० लाख डॉलर्स कमावलेत. भारतीय रुपयांत त्याची किंमत ५०० कोटींच्या पुढे जाते. आता पहिल्याच दिवशी इतके पैसे कमावलेत म्हटल्यानंतर यापुढेही हा चित्रपट अनेक विक्रम प्रस्थापित करेल, अशा शक्यता वर्तवल्या जातायत.