मुंबई : दोन वर्ष प्रेक्षकांच्या प्रतिक्षेत असलेला सिनेमा 'बाहुबली : द कंक्लूजन' हा सिनेमा १८ एप्रिलला रिलीज झाला. सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याने अनेक रेकॉर्ड्स बनवले. आता रिलीज झाल्यानंतर ही सिनेमा अनेक रेकॉर्ड करत आहे.
सिनेमाने 121 कोटींची ओपनिंग करत सगळ्यांनाच धक्का दिला. पहिल्या दिवशी सिनेमा 80 कोटी कमवेल असं मत तज्ञांनी व्यक्त केलं होतं पण बाहुबली त्याहून ही बराच पुढे निघून गेला. बाहुबलीने सलमान खानची ईद, शाहरुख खानची दिवाळी आणि आमीर खानच्या क्रिसमसचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे.
१. सिनेमाने सर्वात जास्त बुकिंगचा रेकॉर्ड बनवला आहे. बाहुबलीने 2 दिवस आधीच 36 कोटी रुपये फक्त प्री बुकींगच्या तिकिटातून कमावले, दंगल सिनेमाने असेच १८ कोटी कमावले होते.
२. 'बाहुबली 2' हा पहिली बॉलिवूड सिनेमा ठरला आहे जो एकसोबत 9000 स्क्रीन्सवर रिलीज झाला. सलमान खानच्या 'सुल्तान' सिनेमाच्या नावे हा रेकॉर्ड होता जो एकसोबत 4350 स्क्रीनवर रिलीज झाला होता.
३. बाहुबली-2 भारतीय सिनेमातील सर्वात मोठा ऑक्यूपेंसी असलेला सिनेमा ठरला आहे. बाहुबली 2 ने सारे रेकॉर्ड मोडत 95 टक्के ओपनिंग केली आणि सर्वाना आश्चर्याच्या धक्का दिला. ऑक्यूपेंसी म्हणजे सिनेमा पाहायला किती प्रेक्षक पोहोचले यावरुन ते ठरवतात. याआधी हा रेकॉर्ड 'प्रेम रतन धन पायो' आणि 'धूम 3' सारख्या सिनेमांकडे होता.
४. 121 कोटीसह 'बाहुबली- 2' 2017 ची सर्वात मोठा ओपनिंग असलेला सिनेमा ठरला आहे. शाहरुख-सलमान-आमिर यांनी प्रयत्न करुनही हा रेकॉर्ड मोडणे कठीण आहे. याआधी शाहरुखच्या रईस सिनेमाने सर्वात मोठी ओपनिंग केली होती जी २० कोटी होती.
५. बाहुबली 2 ने पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या वरची कमाई केली आहे. भारतीय सिनेमांमध्ये असं करणारा तो पहिला सिनेमा ठरला आहे. याआधी बाहुबली १ ने २ दिवसात १०० कोटींच्यावर कमाई केली होती.