हैदराबाद : बहुप्रतिक्षित आणि बहुभाषी चित्रपट बाहुबली आज जगभरातील मोठ्या पडद्यावर झळकला. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी पसंती दिली. देशातील ही आतापर्यंतची सर्वात महागडा चित्रपट म्हटला जात आहे.
जगभरातील ४ हजार थिएटरमध्ये आज या चित्रपटाला रिलीज करण्यात आले. या चित्रपटासाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या अॅक्शन ड्रामा चित्रपटात प्रभास, राणा दुग्गुबती, राम्या, कृष्णा, अनुष्का आणि तमन्ना यांनी प्रमुख भूमिका वठवल्या आहेत.
चित्रपट रिलीज झाल्यावर आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या थिएटरमध्ये हाऊसफूल गर्दी आहे. दोन्ही राज्यातील काही ठिकाणी गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. तिकीटांची अॅडव्हान्स बुकिंग व्यवस्था फिल्म रिलीजपूर्वी कोलमडली आहे. अनेक ठिकाणी ऑनलाइन बुकिंग होत असल्याने अनेक अनेक ठिकाणी कम्प्युटर सर्व्हर हँग झाले आहेत. सिंगल थिएटर आणि मल्टीप्लेक्सबाहेर तिकीटांसाठी लांबच लांब रांगा आहेत.
अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी चित्रपटाची प्रशंसा केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.