प्लॅस्टिक सर्जरीच्या त्या अफवांवर आयेशा टाकिया भडकली

अभिनेत्री आयेशा टाकियानं प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे काही फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले होते.

Updated: Feb 26, 2017, 08:03 PM IST
प्लॅस्टिक सर्जरीच्या त्या अफवांवर आयेशा टाकिया भडकली  title=

मुंबई : अभिनेत्री आयेशा टाकियानं प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे काही फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले होते. आयेशाची प्लॅस्टिक सर्जरी फसलेली दाखवण्यासाठी तिचे काही विद्रुप फोटो शेअर करण्यात येत होते. पण हे फोटो मॉर्फ करून पसरवण्यात आल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

खुद्द आयेशा टाकियानंच या सगळ्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. इन्सटाग्रामवर आयेशानं तिचा नवा फोटो टाकला आहे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं म्हंटलं आहे. 

 

A post shared by Ayesha Takia Azmi (@ayeshatakia) on