'म्हणून टार्गेट केलं जातं'

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून वादामध्ये अडकले आहेत.

Updated: May 12, 2016, 06:29 PM IST
'म्हणून टार्गेट केलं जातं' title=

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून वादामध्ये अडकले आहेत. अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपरनं केला आहे. तर कौन बनेगा करोडपती या शो मधल्या अमिताभ बच्चन यांच्या कमाई पुन्हा तपासण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले. कौन बनेगा करोडपती या शोच्या कमाईतल्या टॅक्सवर सूट द्यायचा निर्णय हायकोर्टानं दिला होता, या निर्णयालाही सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. 

या सगळ्या वादावर अमिताभ बच्चन यांनी मौन सोडलं आहे. प्रसिद्धी आणि यश मिळालं की विरोध, बदल्याची भावना, जळू वृत्ती वाढते अशी प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर ही प्रतिक्रिया दिली आहे.