पीके : अमिर खानने चक्क कपडेच उतरविले

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खानने चक्क कपडेच उतरविले.  हे वाचून तुम्ही हैराण झालात ना! मात्र, ही बाब खरी आहे. हे तुम्हाला ‘पीके’च्या पोस्टरवरुन दिसून येईल.

Updated: Aug 1, 2014, 03:36 PM IST
पीके : अमिर खानने चक्क कपडेच उतरविले title=

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खानने चक्क कपडेच उतरविले.  हे वाचून तुम्ही हैराण झालात ना! मात्र, ही बाब खरी आहे. हे तुम्हाला ‘पीके’च्या पोस्टरवरुन दिसून येईल.

या पोस्टरमध्ये अमिर खान जवळपास नग्नच आहे. त्यामुळे या पोस्टरबाबत सोशल नेटवर्किंग साईट्सवर जोरदार चर्चा सुरु आहे. अमिरने वेगळी आयडीया शोधल्याचे बोलले जात आहे.  या पोस्टरमध्ये अमिर खान रेल्वे ट्रॅकवर बिन कपड्याचा उभा आहे. त्याच्या हातात केवळ एक रेडिओ आहे.

नेहमी वेगळा प्रयोग करणारा अभिनेता अमिरने आपला हा फंडा कायम ठेवला आहे. ते ‘पीके’च्या पोस्टरवरुन दिसून येत आहे. थ्री इडियट्स या सुपरहीट सिनेमानंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अमिर खान या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. 

‘पीके’या सिनेमात आमीर ‘एलियन’ची भूमिका साकरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सिनेमात आमिरसोबत अनुष्का शर्मा आणि सुशांतसिंह रजपूत यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. हा सिनेमा 19 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

थ्री इडियट्स या सिनेमाने बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच तब्बल 200 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता ‘पीके’ किती गल्ला करेल याची उत्सुकता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.