'एअरलिफ्ट'च्या यशाने अक्षय कुमारला आनंद, आता असे चित्रपट अधिक करणार

अक्षयकुमारचा सिनेमा एअरलिफ्ट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. 

Updated: Jan 27, 2016, 02:37 PM IST
 'एअरलिफ्ट'च्या यशाने अक्षय कुमारला आनंद, आता असे चित्रपट अधिक करणार title=

मुंबई : अक्षयकुमारचा सिनेमा एअरलिफ्ट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. पहिल्या दोन दिवसांमध्ये 27 कोटींचा गल्ला जमाविण्यात या सिनेमाला यश आलं आहे..

शुक्रवारी म्हणजे ओपनिंगच्या दिवशी सिनेमाने 12.35 कोटींची कमाई केली तर दुस-या दिवशी 14.60 कोटींची कमाई या सिनेमाने केली..रविवारीही सिनेमाने 19 कोटींची कमाई केली एसून चार  दिवसांमध्ये 55 कोटींची कमाई या सिनेमाने केली आहे..

त्यामुळे एअरलिफ्ट आता अजुन किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

अक्षयने आपल्या चित्रपटाच्या यशानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी लोकांच्या प्रतिक्रियेने खूश आहे. त्यांनी मला अशा प्रकारचे चित्रपट बनिवण्याची आणि त्यात काम करण्याची प्रेरणा मिळते. 

अशा प्रकारच्या चित्रपटांविषयी अनेक प्रकारचे तर्क बॉक्स ऑफिसवर लावले जातात. पण बॉक्स ऑफिसवरील गल्ला पाहिल्यावर वाटते की असे चित्रपट आणखी करायला पाहिजे.  वास्तविक काहण्या रुपेरी पडद्यावर आणायला हव्यात. 

या चित्रपटानंतर अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते असे चित्रपट करायला तयार होतील. ज्यात गाणे कमी आणि कंटेन्ट अधिक असेल.