खिलाडी अक्षयची संवेदनशीलता, शहिदांच्या कुटुंबियांना मदत

बॉलीवूडचा खिलाडी नंबर वन आणि ऍक्शन हिरो अक्षय कुमारच्या संवेदनशीलतेचं आणखी एक उदाहरण समोर आलंय.

Updated: Mar 16, 2017, 10:15 PM IST
खिलाडी अक्षयची संवेदनशीलता, शहिदांच्या कुटुंबियांना मदत  title=

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी नंबर वन आणि ऍक्शन हिरो अक्षय कुमारच्या संवेदनशीलतेचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांना अक्षयनं मदत केली आहे.  

छत्तीसगडमधल्या सुकमा इथे 11 मार्चला नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांना अक्षय कुमार यांनी आर्थिक मदत दिली आहे. प्रत्येक शहिदाच्या कुटुंबाला 9 लाख रुपये अशा प्रकारे 1 कोटी 8 लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत अक्षय कुमारनं दिली आहे.