दिवाळीचा आनंद तुमच्यामुळेच, अक्षय कुमारच्या जवानांना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांना शुभेच्छा देण्यासाठी अभियानाची घोषणा केली आहे.

Updated: Oct 24, 2016, 08:58 PM IST
दिवाळीचा आनंद तुमच्यामुळेच, अक्षय कुमारच्या जवानांना शुभेच्छा title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांना शुभेच्छा देण्यासाठी अभियानाची घोषणा केली आहे. मोदींच्या या अभियानाला अभिनेता अक्षय कुमारनं शुभेच्छा दिल्या आहेत. कोणत्याही सणाचा आनंद आपण आपल्या व्यक्तींबरोबर घेतो. पण तुमच्यामुळेच आम्हाला हा आनंद घेता येतो, असं अक्षय कुमार म्हणाला आहे.

तुमच्यामुळेच आम्ही आहोत, तुमच्यामुळेच देशही आहे असंही अक्षय म्हणाला आहे. #Sandesh2Soldiers हा हॅशटॅग वापरून नरेंद्र मोदी अॅप किंवा mygov.in या वेबसाईटवर तुम्हालाही जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देता येतील.

पाहा काय म्हणाला अक्षय कुमार