'वेळेवर जाऊन नाचगाणी करणाऱ्यांनाच पुरस्कार मिळतो'

बॉलीवूडच्या चित्रपटांना मिळणाऱ्या पुरस्कारांबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात.

Updated: Sep 18, 2016, 10:52 AM IST
'वेळेवर जाऊन नाचगाणी करणाऱ्यांनाच पुरस्कार मिळतो' title=

मुंबई : बॉलीवूडच्या चित्रपटांना मिळणाऱ्या पुरस्कारांबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. बॉलीवूड चित्रपटांना मिळणारे पुरस्कार हे फिक्स असतात अशी टीकाही अनेक जण करतात. या वादावर आता अभिनेता अजय देवगननंही वक्तव्य केलं आहे. 

अजय देवगन निर्मित पार्श या चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे. यावरूनच अजय देवगननं पुरस्कार सोहळ्यांची खिल्ली उडवली आहे. पुरस्कार सोहळ्याला जो वेळेवर जातो आणि जो नाचगाणी करतो त्याला पुरस्कार दिला, अशाप्रकारचे हे पुरस्कार नसतात असं अजय देवगन म्हणाला आहे. 

पुरस्कार सोहळ्यांना जेवढे जास्त अभिनेते-अभिनेत्री येतात तेव्हा अनेक चॅनल्स हे पुरस्कार सोहळे विकत घेण्यासाठी उत्सुक होतात, त्यामुळे जास्त पैसे मिळतात. पुरस्कार सोहळे पैसे कमावण्याचं साधन झालं असल्याची प्रतिक्रिया अजय देवगननं दिली आहे.