ऐश्वर्याने शाहरुखबाबत केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्‍वर्या रॉयने एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडचा रोमांस किंग शाहरूख खानवर गंभीर आरोप लावले आहेत. शाहरुखबाबत तिने काही खुलासे केले आहेत. ऐश्‍वर्या रॉय बच्‍चनला जेव्हा तिच्या सिनेमामधील करिअरबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने हे खुलासे केले. तिने म्हटलं की एक वेळ अशी होती जेव्हा आम्ही एकसोबत अनेक सिनेमे करत होतो. पम अचानक सगळे प्रोजेक्ट्स संपले. मी कोणालाही काहीही जावून विचारलं नाही आणि समोरच्यानेही काहीही नाही सांगितलं. त्याने असं का केलं हे मी त्याला जाऊन नाही विचारलं कारण ते माझ्या आत्मसन्माना विरोधात होतं.

Updated: Oct 12, 2016, 09:09 PM IST
ऐश्वर्याने शाहरुखबाबत केला मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्‍वर्या रॉयने एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडचा रोमांस किंग शाहरूख खानवर गंभीर आरोप लावले आहेत. शाहरुखबाबत तिने काही खुलासे केले आहेत. ऐश्‍वर्या रॉय बच्‍चनला जेव्हा तिच्या सिनेमामधील करिअरबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने हे खुलासे केले. तिने म्हटलं की एक वेळ अशी होती जेव्हा आम्ही एकसोबत अनेक सिनेमे करत होतो. पम अचानक सगळे प्रोजेक्ट्स संपले. मी कोणालाही काहीही जावून विचारलं नाही आणि समोरच्यानेही काहीही नाही सांगितलं. त्याने असं का केलं हे मी त्याला जाऊन नाही विचारलं कारण ते माझ्या आत्मसन्माना विरोधात होतं.

बॉलिवूडचा ब्‍लॉकबास्‍टर सिनेमा 'देवदास' रिलीज झाल्यानंतर शाहरूख आणि ऐश्‍वर्या यांची जोडी लोकांनी पसंत येत होती. चलते-चलते या सिनेमामध्ये शाहरुख-ऐश्वर्या एकत्र काम करत होती. एका दिवशी सलमानने सेटवर येऊन खूप हंगामा केला. त्यानंतर शाहरुखने ऐश्वर्यासोबत कधीच काम नाही केलं. खूप वर्षांनतर करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये शाहरूख खान पुन्हा एकदा ऐश्वर्यासोबत एकत्र दिसणार आहे. या सिनेमात तो ऐश्वर्याच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे.