एअरलिफ्टची रेकॉर्डब्रेक कमाई

अक्षयकुमारचा सिनेमा एअरलिफ्ट सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. या वर्षातील १०० कोटींच्या क्लबमध्ये जाणारा एअरलिफ्ट पहिलाच सिनेमा ठऱलाय.

Updated: Feb 1, 2016, 03:21 PM IST
एअरलिफ्टची रेकॉर्डब्रेक कमाई title=

मुंबई : अक्षयकुमारचा सिनेमा एअरलिफ्ट सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. या वर्षातील १०० कोटींच्या क्लबमध्ये जाणारा एअरलिफ्ट पहिलाच सिनेमा ठऱलाय.

या सिनेमाने आतापर्यंत ११० कोटींची कमाई केली आहे. ओपनिंग डेला या सिनेमाने १२.३५ कोटींची कमाई केली तर दुस-या दिवशी १४.६० कोटींची कमाई या सिनेमाने केली.

त्यानंतर माऊथ पब्लिसिटीचा सिनेमाला चांगलाच फायदा झाला. त्यामुळे भविष्यात अजून रिएलिस्टीक सिनेमा करणार असल्याचं अक्षय कुमारनं जाहिर करुन टाकलंय.