आदितीच्या 'रिव्हिलिंग कट'वर खिळल्या अनेकांच्या नजरा

बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये त्यांनी परिधान केलेल्या लेटेस्ट फॅशनच्या चर्चा तर तशा नेहमीच्याच... पण, काही वेळेस अभिनेत्रींची स्टाईल अशी काही असते की ती हेडलाईन्सची आणि चर्चेसाठी जागा निर्माण करते. 

Updated: Oct 1, 2014, 01:43 PM IST
आदितीच्या 'रिव्हिलिंग कट'वर खिळल्या अनेकांच्या नजरा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये त्यांनी परिधान केलेल्या लेटेस्ट फॅशनच्या चर्चा तर तशा नेहमीच्याच... पण, काही वेळेस अभिनेत्रींची स्टाईल अशी काही असते की ती हेडलाईन्सची आणि चर्चेसाठी जागा निर्माण करते. 

नुकतंच जीक्यू इंडिया अॅवॉर्डचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक सुंदऱ्यांनी आपलं दर्शन दिलं... पण, यामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते आदिती राव हैदरीनं... आणि तिच्या रिव्हिलिंग कटच्या ड्रेसनं... 

डीप नेकलाईन, रिव्हिलिंग कट आणि हॉलिवूड स्टाईलच्या ड्रेसमध्ये अनेक अभिनेत्री या कार्यक्रमात दिसल्या. अदिती राव हैदरीनं काळ्या रंगाचा रिव्हिलिंग कट ड्रेस परिधान केला होता. तिचा ड्रेस पाहून अनेकांच्या नजरा साहजिकच तिच्याकडे वळत होत्या. 

यावेळी, अभिनेत्री मुग्धा गोडसे गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये तर मंदिरा बेदी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये या कार्यक्रमात दाखल झाली होती. नर्गिस फाखरी आणि आदिती राव यांचा हॉट अंदाज लोकांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.