मुंबई : एका काळातली अभिनेत्री सोनम 'आखिरी अदालत' आणि 'त्रिदेव' सिनेमामध्ये दिसली होती. पण लग्नानंतर ती अचानक या सिनेसृष्टीतून गायबच झाली. मागच्या २५ वर्षापासून ती एक अनोळखी जीवन जगत आहे.
सोनमचे पती राजीव राय यांनी मोहरा आणि गुप्त यासारखे सिनेमे बनवले होते. पण सोनम आणि तिच्या पतीमध्ये घटस्फोट झाला आहे. राय यांनी म्हटलं की, 'आम्ही मागच्या वर्षी कायद्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यामध्ये कोणताही वाद किंवा असहमती नव्हती. वेगळं होण्याचं काही खास कारण नाही आहे. आमचं विवाहित जीवन सुरळीत करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण आम्ही अपयशी ठरलो.'
'त्रिदेव'च्या सेटवर जुळलं होतं प्रेम
राजीव आणि सोनम त्रिदेव (1989)च्या मेकिंग दरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. ३ वर्षानंतर दोघांनी २१ जानेवारी १९९१ ला विवाह केला होता.
लग्नानंतर सोडलं करिअर
राजीवसोबत विवाह झाल्यानंतर सोनमने बॉलिवूडला अलविदा केलं होतं. राजीवने देखील गुप्त सारखा सूपरहिट सिनेमा दिला होता. त्यानंतर राजीव अंडरवर्ल्डच्या टारगेटवर आला. त्याच्या ऑफिससमोर जेव्हा त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा हे दोघेही भारत सोडून विदेशात स्थायिक झाले. लॉस अँजलस, स्वित्झरलँड आणि त्यानंतर काही वर्षानंतर ते मुंबईत परतले. २००१ पासून दोघे वेगळे राहत होते.
मुलाच्या शिक्षणामुळे होते एकत्र
मुलाच्या शिक्षणासाठी दोघेही एकत्र होते पण परदेशात वेगवेगळ्या रुममध्ये राहयचे. मुलाचं वय १८ वर्ष होण्याची ते वाट पाहत होते. आता त्यांचा मुलगा हा १३ वर्षाचा झाला आहे त्यामुळे त्यांनी आता कायदेशीर वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे.