झगमगटाच्या दुनियेतून अंधारात गुडूप झालेला हा अभिनेता... ओळखतोय का?

पंजाबी सिनेमाचा एकेकाळचा प्रसिद्द अभिनेता आता मात्र पडद्याआड गुडूप झालाय. सतीश कौल हा तो अभिनेता... त्यांचाच हॉस्पीटलमधला एक फोटो सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Updated: Jun 16, 2016, 03:57 PM IST
झगमगटाच्या दुनियेतून अंधारात गुडूप झालेला हा अभिनेता... ओळखतोय का? title=

लुधियाना : पंजाबी सिनेमाचा एकेकाळचा प्रसिद्द अभिनेता आता मात्र पडद्याआड गुडूप झालाय. सतीश कौल हा तो अभिनेता... त्यांचाच हॉस्पीटलमधला एक फोटो सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

एकेकाळी पंजाबी सिनेइंडिस्ट्रीचा स्टार अभिनेता म्हणून सतीश कौल ओळखले जायचे... त्यांनी जवळपास २०० हून अधिक पंजाबी सिनेमांत मुख्य भूमिका निभावलीय. ३० वर्षांपूर्वी अभिनेत्री नुतन यांच्यासोबत 'कर्मा' या सिनेमातही सतीश दिसले होते. 


'कर्मा' सिनेमात नुतन यांच्यासोबत

मुंबई सोडली... 

गेल्या तीन वर्षांपूर्वी सतीश कौल यांनी मुंबई सोडली... आणि ते लुधियानामध्ये स्थायिक झाले. सिनेसृष्टीतून कमावलेल्या पैशांतून त्यांनी लुधियानामध्ये एका 'अभिनय शाळा' सुरू केली. परंतु, त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही... आणि एक असाही क्षण आला जेव्हा खाण्या-पिण्याचीही अडचण समोर दिसू लागली. 

मदतीचा हात... 

अशा परिस्थितीत 'लुधियाना सिटीजन काऊन्सिल' या एका समाजसेवी संस्थेनं सतीश कौल यांना मदतीचा हात देऊ केला. या संस्थेच्या माध्यमातून सतीश कौल यांना रेडक्रॉस भवनच्या वृद्धाश्रमात भरती केलं. इथं ते चार महिने होते. त्यानंतर त्यांना दोराहामध्ये हेवनली पॅलेसमध्ये जागा दिली गेली. 

गंभीर दुखापत... 

इथंही त्यांचं दुर्दैवं आडवं आलंच... २०१४ मध्ये पटियालामध्ये असताना पाय घसरून झाल्याचं निमित्त झालं आणि ६२ वर्षांच्या सतीश कौल यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे पुढच्या वर्षभर त्यांच्यावर ज्ञानसागर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. आता मात्र त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळालाय.