मुंबई : ‘सीबीएफसी’चे सीईओ राकेश कुमार यांच्या अटकेनंतर बॉलिवूडचे आणखी कोणत्या सिनेमांनी लाच देऊन सर्टिफिकेट मिळवलेत, याची जोरदार चर्चा बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे. याच बाबतीत अभिनेता आमिर खानला विचारलं असता, त्यानं आपले दोन्ही हात कानावर ठेवलेत.
सेन्सॉर बोर्डकडून चित्रपटाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लाच देण्यापर्यंतची स्थिती कधीही माझ्यासमोर निर्माणच झाली नाही, असं आमिरनं म्हटलंय. 'उलट माझ्याकडून कोणी लाच मागितली असती तर मीच पोलिसांना बोलावलं असतं' असं आमिरनं म्हटलंय. 'पीके' या आपल्या आगामी सिनेमाच्या दुसऱ्या पोस्टरच्या लॉन्चिंगवेळी तो उपस्थित झाला होता.
सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’चा मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश कुमारला सोमवारी लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक केली गेलीय. कोर्टाने त्यांना मंगलवारी तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.
कुमारबद्दल जेव्हा आमिरला विचारण्यात आलं तेव्हा, 'माझा कुमारशी कोणताही व्यक्तीगत अनुभव नाही... त्यामुळे मी या विषयावर काहीही टिप्पणी नाही करणार' असं आमिरनं म्हटलं.
सीबीएफसीच्या एखाद्या एजंटनं लाच मागण्यासाठी तुझ्याशी संपर्क केला होता का? असा प्रश्न जेव्हा आमिरला विचारला गेला तेव्हा 'माझ्याकडे कधीही कुणीच लाच मागितलेली नाही... आणि जर कुणी मागितली असती तर मीच पोलिसांना बोलावून घेतलं असतं आणि त्याची अधिकृत तक्रार दाखल केली असती' असं उत्तर आमिरनं दिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.