मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिने गुरूवारी म्हटले की ती आपला राष्ट्रीय पुरस्कार परत करणार नाही. हा सन्मान राष्ट्राने दिले आहे, कोणत्या सरकारने नाही.
काही प्रसिद्ध चित्रपट कलाकारांनी एफटीआयआय विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि देशातील असहिष्णुतेचे वातावरणाविरोधात आपले राष्ट्रीय पुरस्कार परत केले असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्या बालन हिने ही टिप्पणी केली आहे.
हा सन्मान राष्ट्राकडून मिळाला आहे, सरकारने दिला नाही. त्यामुळे तो मी परत करणार नाही. विद्या बालनला २०१२ मध्ये 'द डर्टी पिक्चर' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.