अमेरिकेत योग गुरू बिक्रम चौधरींना लैंगिक छळ प्रकरणी १० लाख डॉलर्सचा दंड

लॉस एंजेलिस : भारतीय - अमेरिकन योग गुरू बिक्रम चौधरी यांना अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील कोर्टाने ९,२५,००० डॉलर्सचा दंड ठोठावला आहे.

Updated: Jan 26, 2016, 05:43 PM IST
अमेरिकेत योग गुरू बिक्रम चौधरींना लैंगिक छळ प्रकरणी १० लाख डॉलर्सचा दंड title=
लॉस एंजेलिस : भारतीय - अमेरिकन योग गुरू बिक्रम चौधरी यांना अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील कोर्टाने ९,२५,००० डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम त्यांना त्यांची २०१३ पर्यंत वकील असणाऱ्या मीनाक्षी जाफा-बोडेन यांना देवी लागणार आहे. 
 
मीनाक्षी यांनी २०१३ मध्ये बिक्रम यांच्याविरुद्ध लैंगिक छळवणुकीचा, लिंगभेदाचा आणि चुकीच्या पद्धतीने कामावरून काढून टाकल्याचा गुन्हा दाखल केला होता. 
 
बिक्रमने मात्र खटल्यादरम्यान या आरोपांचा इन्कार केला होता. २०११ साली भारतातून आणलेल्या मिनाक्षीला अमेरिकेत वकीली करण्याची परवानगी नसल्यानेच आपण तिला कामावरुन काढल्याचे त्याने म्हटले. 



पण मिनाक्षीच्या वकिलाने मात्र बिक्रमने आपल्या विद्यार्थिनींसोबत केलेल्या गैरवर्तनाचा तपास मिनाक्षी करत असल्याने बिक्रमने असे केल्याचे म्हटले. न्यायालयाने मिनाक्षीच्या बाजूने पूर्णपणे निकाल दिला आहे. 



बिक्रम चौधरी हे त्यांच्या ९० मिनीटांत २६ योगासने करण्याच्या अनोख्या स्टाईलमुळे प्रसिद्ध आहेत.