नवी दिल्ली : जगातील सर्वाच्च स्थानावर पोहचलेल्या दोन बड्या कंपनीचे मालक आपल्या कंपन्यांत केवळ ‘तीन दिवस काम’ ही संकल्पना अंमलात आणायच्या विचारात आहेत.
कार्लोस स्लिम आणि रिचर्ड ब्रेन्सन हे दोन उद्योगपती आपल्या कंपन्यांत ‘थ्री डे वीक’ मॉडेल लागू करण्याचा गंभीरतेनं विचार करत आहेत. या दोघांच्या जगभरात जवळपास 600 कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये जवळपास 95,000 कर्मचारी काम करत आहेत. ‘थ्री डे वीक’मुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असं स्लिम आणि ब्रेन्सन यांना वाटतंय.
कोण आहे कार्लोस स्लिम
मॅक्सिकोचा रहिवासी असलेला कार्लोस जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे. ते टेलिकॉम कंपनी ‘टेलमॅक्स’चे सीईओ आणि कार्सो समूहाच्या कंपनीचे अध्यक्ष आहेत. जगभरातील 200 पेक्षा जास्त कंपन्यांचा कारभार ते हाताळत आहेत. त्यांच्याकडे 50,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची फौज आहे.
कोण आहे रिचर्ड ब्रेन्सन
तर, ब्रेन्सन यूरोपमधील प्रसिद्ध वर्जिन ग्रुपचे मालक आहेत. या ग्रुपच्या जवळपास 400 कंपन्या सध्या कार्यरत आहेत. यामध्ये जवळपास 45,000 कर्मचारी काम करत आहेत.
काय आहे ‘थ्री डे वीक’ मॉडेल?
* ‘थ्री डे वीक’ मॉडेलमध्ये आठवड्यातून केवळ तीन दिवस काम करण्याचा सल्ला दिला गेलाय. दर दिवशी 11 तास कर्माचारी काम करतील.
* आठवड्यात 33 तासांचं काम केल्यानंतर चार दिवस कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळेल आणि ते आपल्या कुटुंबीयांना वेळ देऊ शकतील.
* वयाच्या 65 व्या वर्षानंतरही जर कुणाला काम करण्याची इच्छा असेल तर त्याला 75 व्या वर्षापर्यंत काम करण्याची संधी दिली जावी.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.