ISIS विरोधात जग एकवटलं

ISIS  या दहशतवादी संघटनेविरोधात आता जग एकवटलंय.. जगातील सर्व शक्तिमान देशांनी इराक आणि सीरियातील आयसीस विरोधात लढण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघानं केलंय. 

Updated: Nov 22, 2015, 03:37 PM IST
ISIS विरोधात जग एकवटलं title=

न्यू यॉर्क : ISIS  या दहशतवादी संघटनेविरोधात आता जग एकवटलंय.. जगातील सर्व शक्तिमान देशांनी इराक आणि सीरियातील आयसीस विरोधात लढण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघानं केलंय. 

तसंच आयसीस आणि अन्य कट्टरपंथी गटाच्या दहशतवाद्यांकडून होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न दुपटीने वाढवावेत असं आवाहनही यूएनच्या सुरक्षा समितीनं केलंय. 

पॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सनं याबाबत मांडलेला ठराव पंधरा सदस्यांच्या सुरक्षा समितीनं एकमतानं मंजूर केलाय.  आयसीस पासून जगाला धोका असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. 

इराक आणि सीरियाव्यतिरीक्त लेबनॉन, तुर्कस्थान, इजिप्त, ट्युनिशिया, बांगलादेश, फ्रान्स इथही आयसीसनं हल्ले केले असून नुकतंच त्यांनी एक रशियन विमानही पाडलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.