www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन
मलेशियन एअरलाइन्सच्या बेपत्ता विमान बोईंग -777ची शोध मोहीम शुरू आहे. मात्र, या विमानाचा वैमानिक महिलांचा शौकीन होता, अशी बाब पुढे आली आहे. त्याच्या बेपरवाईमुळे 239 व्यक्तींच्या जीवावर हा शौक बेतल्याचे सांगितले जात आहे. कॉकपिटमध्ये महिला प्रवाशांबरोबर मौज मस्ती करण्याचे त्याला आवडायचे, असा दावा अमेरिकन फेडरल एव्हिएशन प्रशासनाने केलाय.
अमेरिकन फेडरल एव्हिएशन प्रशासनाने याआधी या वैमानिकाबाबत धोक्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे या वैमानिकाची बेजबाबदारी मलेशियन विमानाच्या अपघाताला कारणीभूत ठरल्याचे म्हटले जात आहे. हा वैमानिक महिला प्रवाशांंबरोबर मौज मस्ती करायचा. तसे त्याला आवडत होते, असे अमेरिकन फेडरल एव्हिएशन प्रशासनाने म्हटले आहे. या वृत्तानंतर मलेशियन एअरलाईन्सने काही छायाचित्र पाहिल्यानंतर दु:ख व्यक्त केलेय. हे ऐकूण धक्का बसला आहे, असे म्हटलेय.
या विमानाचा पायलट हा दक्षिण आफ्रिकामध्ये प्रथम अधिकारी अब्दुल हमीद दोन महिला प्रवाशांसह छायाचित्राची पोझ देताना दिसत आहे. विमान उड्डाणाच्यावेळी कायद्याचे नियमाविरोधात तो सिगरेट ओढत असे. तसेच विमान उड्डाण आणि लॅंडींगच्यावेळी कॉकपिटमध्ये महिला प्रवाशांबरोबर बसला होता, असे अमेरिकन फेडरल एव्हिएशन प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी हे मलेशियन एरलाईन्स प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. अशामुळे विमानातून प्रवास करणाऱ्यांना याचा धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या विमान अपघाताबाबत तशी शंका व्यक्त होत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.