महिलेनेच केली स्वतःची कार सीटवर प्रसुती

यू-ट्युबवर वायरल झालेल्या एका व्हिडिओने सगळ्यांनाच चकित करून टाकले आहे.  या व्हिडिओमध्ये एक गर्भवती महिला गाडीच्या पुढील सीटवर बसून स्वतःची प्रसुती करताना दाखविले आहे.

Updated: Jul 19, 2015, 11:27 AM IST
महिलेनेच केली स्वतःची कार सीटवर प्रसुती  title=

ह्युस्टन : यू-ट्युबवर वायरल झालेल्या एका व्हिडिओने सगळ्यांनाच चकित करून टाकले आहे.  या व्हिडिओमध्ये एक गर्भवती महिला गाडीच्या पुढील सीटवर बसून स्वतःची प्रसुती करताना दाखविले आहे.

तिच्या बाजूच्या आसनावर बसलेल्या माणसाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काढला आहे. 

अमेरिकेतील ह्युस्टन जवळचं राहणारे हे जोडपे आहे. गुरूवारी प्रसुतीवेदना चालू झाल्याने, हे जोडपे हॉस्पिटलमध्ये जात होते. पण वाटेतचं त्या महिलेने स्वतःच स्वतःची प्रसुती केली.

ज्याने हा व्हिडिओ काढला तो तिचा पती असावा. 'वी हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 45 मिनिट्स अलरेडी' या नावाने हा व्हिडिओ यु-ट्युबवर अपलोड केला आहे. 

यात दाखवल्याप्रमाणे त्या महिलेच्या हातात रक्ताने माखलेला नवजात बाळ आहे. या जोडप्याला दोन मुली आहेत. त्याचा जन्म एरिया बर्थ सेंटरमध्ये झाला आहे तर या नवजात शिशूचा जन्म कारमध्ये झाला. या बाळाचे वजन 10 पौंडापर्यंत आहे.  

हा व्हिडिओ यु-ट्युबवर सध्या फारचं वायरल होत आहे.  अनेक देशातून यावर निरनिराळ्या कमेंट्स येत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.