इलेक्ट्रिकच्या वायरवर महिलेची स्टंटबाजी

चीनच्या गिझोहुमध्ये एक महिला इलेक्ट्रिक पोलच्या वायरवर स्टंटबाजी करत असल्यामुळे अग्निशमन अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. 

Updated: Mar 14, 2016, 07:22 PM IST
इलेक्ट्रिकच्या वायरवर महिलेची स्टंटबाजी title=

गिझोहु: चीनच्या गिझोहुमध्ये एक महिला इलेक्ट्रिक पोलच्या वायरवर स्टंटबाजी करत असल्यामुळे अग्निशमन अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. 

स्टंटबाजी करणाऱ्या या महिलेला खाली उतरवण्यासाठी अग्निशमन अधिकाऱ्यांनी वारंवार विनंती केली, पण ती काही केल्या ऐकायला तयार नव्हती. 

अखेर या महिलेला खाली आणण्यासाठी अग्निशमन अधिकाऱ्यांनी वायर हलवायला सुरुवात केली. महिलेला दुखापत होऊ नये म्हणून अग्निशमन अधिकाऱ्यांनी रस्त्यावर गादी घातली. अधिकाऱ्यांच्या या प्रयत्नांनंतर ही महिला खाली आली.  

ही महिला मानसिक रुग्ण आहे. तिची ही स्टंटबाजी पाहण्यासाठी नागरिकांनीही रस्त्यावर मोठी गर्दी केली होती.

पाहा महिलेची स्टंटबाजी