काबूल : मुस्लिम देशातील महिलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय. पतीशिवाय बाजारात जाणाऱ्या एका महिलेला चक्क शिरच्छेदाची शिक्षा दिली गेलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, काही हत्यारधारी व्यक्तींनी महिेलेचा शीर धडावेगळं करत या शिक्षेची पूर्तता केलीय. सर-ए-पूल प्रांतात ही घटना घडलीय. हा भाग तालिबानच्या नियंत्रणाखाली आहे.
मिडल इस्ट प्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, काही सामान खरेदी करण्यासाठी ही महिला बाजारात गेली होती. तिचा पती इराणमध्ये आहे. तालिबानच्या आदेशानुसार, कोणत्याही महिलेला नातेवाईक पुरुषांशिवाय घराच्या बाहेर निघण्यास बंदी आहे. इतकंच नाही तरी महिलांना नोकरी करण्याचा किंवा शिक्षण घेण्याचाही अधिकार नाही. बुरखा परिधान करणं त्यांच्यासाठी अनिवार्य आहे.