बर्लिनमध्ये मोदी झाले लाजिरवाणे

भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी ब्राझीलमध्ये ब्रिक्स संम्मेलनाच्या आधी मोठ्या लाजिरवाणी गोष्टीला सामोरे जावे लागले. जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यांनी मोदींना ब्राझीलला जाण्याआधी जेवण्याचे निमंत्रण दिले. मात्र, खुद मर्केल हे आपल्या देशाच्यावतीने आदरातिथ्य करण्यासाठी उपस्थितच नव्हते.

AP | Updated: Jul 15, 2014, 09:38 AM IST
बर्लिनमध्ये मोदी झाले लाजिरवाणे title=

बर्लिन : भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी ब्राझीलमध्ये ब्रिक्स संम्मेलनाच्या आधी मोठ्या लाजिरवाणी गोष्टीला सामोरे जावे लागले. जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यांनी मोदींना ब्राझीलला जाण्याआधी जेवण्याचे निमंत्रण दिले. मात्र, खुद मर्केल हे आपल्या देशाच्यावतीने आदरातिथ्य करण्यासाठी उपस्थितच नव्हते.

फिफा फुटबॉल विश्वविजेता जर्मनीच्या जल्लोष कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थिती लावणे पसंत केले. हा कार्यक्रम होण्याआधीच मर्केल हे आधीच ब्राझीलमध्ये आहेत. ही गोष्ट भारतीय अधिकारी विसरलेत. त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी मर्केल यांच्या जेवण्याचे निमंत्रण स्वीकारणे हे हास्यास्पद असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

याच दरम्यान, मोदी बिक्स संम्मेलनासाठी ब्राझीलला पोहोचले. ब्रिक्स संम्मेलनाआधी मोदींनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या दोन देशांशी झालेली ही पहिलच चर्चा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.