www.24taas.com, झी मीडिया, बिजिंग
एका रेल्वे स्टेशनवर लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर अशी काही दृश्ये दिसू लागली, की ती पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. आणि ती दृश्ये म्हणजे दुसरे तिसरे काही नसून चक्क एक पॉर्न फिल्म होती.
एका दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चीनमधील जिलीन स्टेशनमध्ये घडली. या स्टेशनमधील टीव्हीची स्क्रीन बिघडली होती. आणि ती दुरुस्त करण्याचं काम एक अधिकारी करत होता. आणि त्यासाठी या स्क्रीनला त्याच्या लॅपटॉपशी जोडण्यात आलं होत. या टीव्हीवर जाहिराती दाखवल्या जातात.
काम झाल्यानंतर तो स्क्रीनशी जोडल्या गेलेल्या लॅपटॉपला डिस्कनेक्ट करण्याच विसरला. आणि पॉर्न फिल्म पाहण्यात दंग झाला. आपण आपल्या लॅपटॉपवर जे काही बघतोय, ते सारं बाहेर टिव्हीच्या स्क्रीनवर दिसतंय याची त्याला साधी कल्पनाही आली नाही. आलेल्या बातमीनुसार पोलिसांनी त्या अधिकाऱ्याची चौकशी केलीय. मात्र अजून त्याला अटक करण्यात आलेली नाही
.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.