पाहा व्हिडिओ : प्रवासी विमानावर वीज पडली आणि...

 एका प्रवासी विमानावर पाऊस सुरू असताना वीज कोसळली आणि या वीज कोसळल्याचं दृश्य एका व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तो व्हिडिओ या व्यक्तीने यूट्यूबवर अपलोड केला असून त्याला लाखो हिट्स मिळत आहे. 

Updated: Aug 21, 2015, 06:23 PM IST
पाहा व्हिडिओ : प्रवासी विमानावर वीज पडली आणि...  title=

न्यूयॉर्क :  एका प्रवासी विमानावर पाऊस सुरू असताना वीज कोसळली आणि या वीज कोसळल्याचं दृश्य एका व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तो व्हिडिओ या व्यक्तीने यूट्यूबवर अपलोड केला असून त्याला लाखो हिट्स मिळत आहे. 

चांगली गोष्ट ही की वीज पडूनही या विमानाने उड्डाण भरलं आणि ते लॉस एंजलिसला सुखरूप पोहचलं. 

अधिक वाचा : सलग ४६ तास वाढदिवसाचा आनंद, गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद

अमेरिकेच्या अॅटलांटा एअरपोर्टवर डेल्टा एअरलाईनचं विमान उड्डाण घ्यायच्या तयारीत होतं. त्याचवेळी या विमानावर वीज कोसळली.  जॅक पार्किस या व्यक्तीच्या कॅमेऱ्यात ही दृश्यं कैद केली आहेत.
 
वीज पडल्याची घटना घडली त्यावेळी विमानात ११७ प्रवासी आणि केबिन क्रूचे 6 सदस्य होते. सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही.

अधिक वाचा : VIDEO: वाइनमध्ये जिवंत साप टाकून पितात ड्रिंक

जॅक पार्किस यांचे विमान खराब हवामानामुळे रनवेवर अडकून पडलेलं होतं. उड्डाणाला उशीर होत होता. याचा व्हिडिओ करुन तो आपल्या पत्नीला पाठवणार होता. त्याचवेळी आकाशातून वीज कोसळली आणि ती विमानाच्या पाठीमागच्या बाजूला धडकली. 

पाहा हा व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.