अमेरिका ‘शटडाऊन’ संकटातून मुक्त

गेले दोन आठवडे अमेरिकन अर्थसत्तेवर आलंलं आर्थिक संकट दूर झालंय. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटीक पक्षात एकमत झालं असून कर्जाची मर्यादा वाढवण्यास सिनेट सदस्य राजी झालेत. त्यामुळं इतिहासात पहिल्यांदाच ओढवलेल्या आर्थिक संकटातून अमेरिकेची सुटका झालीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 17, 2013, 02:16 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
गेले दोन आठवडे अमेरिकन अर्थसत्तेवर आलंलं आर्थिक संकट दूर झालंय. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटीक पक्षात एकमत झालं असून कर्जाची मर्यादा वाढवण्यास सिनेट सदस्य राजी झालेत. त्यामुळं इतिहासात पहिल्यांदाच ओढवलेल्या आर्थिक संकटातून अमेरिकेची सुटका झालीय.
कर्ज फेडण्याची १७ ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकात एकमत होत नसल्यामुळं अमेरिकेवरचं आर्थिक संकट गडद होत चाललं होतं. त्यामुळं अमेरिकेवर दिवाळखोरीचं संकट ओढवणार होतं. अखेरीस हे संकट टळलंय. कर्ज घेण्याचे अधिकार असलेलं मंडळ १७ ऑक्टोबरला बरखास्त होणार होतं. प्रस्ताव मंजूर झाल्यामुळं आता या मंडळाची मुदत ७ फेब्रुवारी २०१४पर्यंत असणार आहे.
अमेरिकी काँग्रेसमध्ये काल या विषयावर वादळी चर्चा झाली. अखेरीस मुदत संपायला चार तास बाकी असताना ८१ विरूद्ध १८ या फरकानं विधेयक मान्य झालाय. यामुळं गेले १६ दिवस अमेरिकेत असलेलं शटडाऊन आता सुरू झालंय. लोकप्रतिनिधी गृहात हे विधेयक मान्य झाल्यावर लगेच यावर स्वाक्षरी केली जाईल अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ