ब्रिटनमध्ये पुन्हा पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचीच सत्ता

 ब्रिटन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॅमेरून यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने ६५० पैकी ३२९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. चांगला प्रचार करून लढत चुरशीची करणाऱ्या लेबर पार्टीला २३२ जागांवर समाधान मानावे लागले. 

Reuters | Updated: May 9, 2015, 11:37 AM IST
ब्रिटनमध्ये पुन्हा पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचीच सत्ता title=

लंडन : विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी ब्रिटनची सत्ता पुन्हा आपल्याकडे राखण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. आतापर्यंत त्यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाने ३१७ जागा जिंकल्या आहेत. ब्रिटनमध्ये बहुमतासाठी ३२६ जागांची गरज होती. ब्रिटन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॅमेरून यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने ६५० पैकी ३२९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. चांगला प्रचार करून लढत चुरशीची करणाऱ्या लेबर पार्टीला २३२ जागांवर समाधान मानावे लागले. . 

६५० पैकी ६३२ जागांचे निकाल जाहीर झाले होते. त्यामध्ये कॉन्झर्वेटिव्ह (३१७) आणि लेबर पार्टी (२२८) अशी मुख्य पक्षांची कामगिरी होती. सर्वाधिक धक्कादायक कामगिरी नोंदविली ती स्कॉटिश नॅशनल पार्टीने (एसएनपी). या पक्षाने स्कॉटलंडमधील ५९ जागांपैकी तब्बल ५६ जागांवर विजय मिळविला आहे. याशिवाय, लिबरल डेमोक्रेट (८), ब्रिटिश इंडिपेडन्स पार्टी (१) यांनी विजय मिळवलाय.

- पाहा निकालाची आकडेवारी

या निवडणुकीमध्ये पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि लेबर पक्षाचे उमेदवार एड मिलिबॅंड यांच्यात जोरदार चुरस होती. निकाल घोषीत होण्यास सुरुवात झाली असताना लेबर पार्टीने जोरदार मुसंडी मारली होती. मात्र, त्यांनतर कॅमेरुन आणि लेबर पार्टीमध्ये चूरस पाहायला मिळाली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.