बीजिंग : 'ऑफिस कल्चर'च्या नावाखाली चीनमधल्या एका कंपनीनं आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी एक नवा नियम लागू केलाय.
या नव्या नियमानुसार, कंपनीत काम करणाऱ्या महिलांनी ऑफिसमध्ये आल्यानंतर दररोज त्यांच्या बॉसला न चुकता किस करणं आवश्यक आहे. हा नवा नियम सर्व महिलांना बंधनकारक आहे.
यामुळे आपांपसातील नातं सुदृढ होऊन कंपनीतलं वातावरण मोकळं राहतं. तसंच यामुळे महिलांनाही प्रेरणा मिळते, असं म्हणत कंपनीनं आपल्या या नव्या नियमाविषयी स्पष्टीकरण दिलंय.
Company requires female staff to kiss boss, claims it enhances corporate culture and unites team https://t.co/McMuUYPmrE pic.twitter.com/mLllEg4JzM
— People's Daily,China (@PDChina) October 8, 2016
उल्लेखनीय म्हणजे, दारुभट्टीसाठी मशिनरी पुरवण्याचं काम ही कंपनी करते... आणि इथं अर्ध्यापेक्षा जास्त महिला काम करतात.
धक्कादायक म्हणजे, अनेक महिला या नियमाविरुद्ध आहेत. परंतु, दोन महिलांनी बॉसला किस करायला नकार दिल्यामुळे त्यांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलंय.