जुबा : स्वप्न पाहणं कधीही सोडू नका, असं म्हटलं जातं. आपल्या आजूबाजूची परिस्थिती काहीही असली पण स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद काही वेगळाच असतो,
दक्षिण सुदानमधील जुबा येथील एका 23 वर्षीय युवकाचे विमान बनवण्याचं स्वप्न होतं. मात्र दुदैवाने त्याच्या वडिलांचा मृत्यु झाला. यामुळे त्याच्यावर आणखी संकटाचा डोंगर कोसळला.
कारण त्याला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. अर्थातच वैमानिक बनण्याचे स्वप्नही दुरावले. परंतु आभाळात उडण्याचं स्वप्न त्याचं दुरावलेलं नव्हतं.
आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील सर्वांत नवीन देश असलेल्या दक्षिण सुदानमधील जॉर्ज मेल या युवकाने आपल्या घराच्या परसदारामध्ये चक्क एक विमान बांधले. त्याच्या या कामगिरीमुळे अत्यंत प्रभावित झालेल्या या देशाच्या हवाई दलाने त्याला तत्काळ नोकरीही दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.