भरदिवसा शाळेत शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात एक पवित्र नातं असतं पण या नात्याला काळीमा फासणारी घटना एका शाळेत घडली आहे. भरदिवसा या शिक्षकाने नग्न होऊन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न केला आहे.

Updated: Mar 30, 2016, 08:41 PM IST
भरदिवसा शाळेत शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न title=

नवी दिल्ली : विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात एक पवित्र नातं असतं पण या नात्याला काळीमा फासणारी घटना एका शाळेत घडली आहे. भरदिवसा या शिक्षकाने नग्न होऊन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न केला आहे.

चीनमधल्या हलाई येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. ३० वर्षीय या नराधम शिक्षकाने शाळेतच बलात्काराचा प्रयत्न केला आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने शाळेतील विद्यार्थी आणि इतर शिक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे.

या विद्यार्थिनीला मोठी दुखापत झाली नसून तिची प्रकृती स्थिर आहे. शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून तो मानसिक रुग्ण असल्याचं बोललं जात आहे.