नवी दिल्ली : तुम्ही बार्बी डॉल पाहिली असेल तिच्याबद्दल लहान मुलींकडून ऐकलं असेल पण प्रत्यक्षात बार्बी डॉलप्रमाणे अत्यंत सुंदर अशी जिवंत बार्बी डॉल अस्तित्वात आहे.
२२ वर्षाच्या हन्नाह इतकी सुंदर आहे की त्यामुळे तिला मानवी बार्बी डॉल म्हणतात. डेली मिररने दिलेल्या एका धक्कादायक बातमीनुसार हन्नाहच्या मते, ती इतकी सुंदर आहे की तिच्या या लूकमुळे पुरूष तिला घाबरतात.
तिला वाटते की लोकांना फक्त तिच्या शरिरामध्ये रुची आहे, तिच्या मनाचा विचार कोणी करत नाही. हन्नाह ही नॉटिंघमशायर येथे राहते. ती आपल्या डोळ्यात कॉन्टक्ट लेंस लावते तिची कंबर २२ इंचाची आहे. तिचे डोळे एकदम बार्बी डॉल सारखे आहेत.
हन्नाह एका बेबी डॉलसारखी दिसत असल्याने तिला हजारो फॉलोवर्स आहेत. बेबी डॉल प्रमाणे दिसत असल्याने तिची आलोचनाही होते. हन्नाह म्हटली तीला पाहून अनेक जण वाइट कमेंटही देतात. तिच्या लूकमध्ये तिच्या कुटुंबियांना काही वेळा विचित्र परिस्थितींचा सामना करावा लागला होता.
हन्नाहच्या परिवाराला तिच्यासोबत फिरायला जाणे आवडत नाही. घरातील व्यक्ती तिच्यासोबत फिरायला घाबरतात, तिला सार्वजनिक ठिकाणी खूप निरखून पाहिले जाते. त्यांना असे निरखून पाहणारे आवडत नाही. शेफिल्ड युनिवर्सिटीची विद्यार्थीनी हन्नाह म्हणते की ती घरातून बाहेर निघते तेव्हा तिला पाहून लोक हसतात.
बेबी डॉलच्या सुंदरतेमुळे तिचा अजून कोणी बॉयफ्रेंड नाही. लोक तिला पाहून मंत्रमुग्ध होतात तिला पसंत करतात, तरीही तिचा अजून कोणी बॉयफ्रेंड नाही. ती बेबी डॉलसारखी दिसते म्हणून तिला कोणी साथीदार मिळत नाही. लहानपणी ती खूप लाजाळू आणि दिसायला विचित्र होती. फॅशन करायला ती घाबरायची...