ब्रिक्सनंतर बिम्सटेकचा देखील पाकिस्तानला मोठा दणका

बिम्सटेकचा पाकिस्तानला मोठा झटका

Updated: Oct 17, 2016, 05:35 PM IST
ब्रिक्सनंतर बिम्सटेकचा देखील पाकिस्तानला मोठा दणका title=

नवी दिल्ली : ब्रिक्सनंतर बिम्सटेकने देखील पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. बिम्सटेकने म्हटलं आहे की, फक्त दहशतवाद्यांवर कारवाई करुन नाही चालणार. दहशतवाद्यांना थारा देणाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे. बिम्सटेकच्या चर्चेत म्हटलं गेलं की, दहशतवाद सध्या स्थिरता आणि शांतीसाठी सर्वात मोठा धोका आहे.

दहशतवादाला कोणत्याही परिस्तिथीत सहन नाही केलं जाणार. काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आम्ही निंदा करतो. दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे. असं देखील म्हटलं गेलं आहे.

उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला ऐकटं पाडण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. सर्जिकल स्ट्राईक करत भारताने पाकिस्तानला दणका दिला. यानंतर देखील भारताकडून आतंरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान विरोधात सगळ्या देशांना एकत्र येण्याची भूमिका मांडली आहे.