हिलरी क्लिंटन यांच्यावर `बूट`हल्ला

लास वेगासमध्ये एका संमेलनात माजी अमेरिका परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांच्यावर भर सभेत बूट फेकण्यात आला. हिलरी यांच्यावर बूट भिरकावणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 11, 2014, 11:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, लास वेगास
लास वेगासमध्ये एका संमेलनात माजी अमेरिका परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांच्यावर भर सभेत बूट फेकण्यात आला. हिलरी यांच्यावर बूट भिरकावणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आलंय.
माजी अमेरिका परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन या अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडीही आहेत. त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ स्क्रॅप रिसायकलिंग इंडस्ट्रीजच्या बैठकीत लोकांना संबोधित करण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. त्या स्टेजवर आल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली आणि एकच गोंधळ उडाला.
बूट भिरकावण्यात आल्यानंतर थोडक्यात हिलरी हल्ल्यापासून वाचल्या. मात्र, पुन्हा शांत होऊन त्यांनी ही गोष्ट हास्यातही उडविली. `माझ्यावर कुणी काही फेकतंय का? सर्कस कलेतला हा एक भाग आहे का?` असं हिलरी यांनी म्हटल्यानंतर बॉलरूममध्ये बसलेल्या एक हजारांपेक्षा जास्त दर्शकांनी हसून टाळ्या वाजवल्या. यानंतर हिलरी यांनी आपलं भाषण पुन्हा सुरू केलं.
हिलरी यांच्यावर बूट फेकणाऱ्या महिलेची अधिक चौकशी सुरू आहे. या महिलेची माहिती उघड करण्यास सुरक्षा यंत्रणेनं नकार दिलाय. त्यांनी स्टेजवरून काळ्या-पिवळ्या रंगाचा एक बूट जप्त केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.