अनमबरा: आता आपण जी बातमी वाचणार आहात, त्यासाठी आपलं मन जरा कठोर करून घ्या.. कारण घटना आहे नायजेरियातील... इथं एका रेस्टॉरंटमध्ये मानवी मांसची विक्री आणि जेवणात वाढलं जात असल्याची धक्कादायक बातमी पुढे आलीय. मानवी मांस विकल्या जात असल्याची बातमी कळताच स्थानिक प्रशासनानं आता रेस्टॉरंटला टाळं ठोकलंय.
डेलीमेल ऑनलाइनमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार, नायजेरियाच्या दक्षिण-पूर्व परिसरातील अनमबराच्या एका रेस्टॉरंटमध्ये मानवी मांस शिजवून ग्राहकांना वाढलं जायचं. याची गुप्त माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. जेव्हा पोलिसांची टीम रेस्टॉरंटमध्ये छापा मारायला पोहोचली. तेव्हा त्यांच्या किचनमध्ये पोलिसांना कापलेले मानवी डोके प्लास्टिकच्या पिशवीत मिळाले. ज्यातून रक्त गळत होतं.
एका पादरीला अनमबराच्या या रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर संशय आला. रेस्टॉरंटमध्ये जेवणाची किंमत कमी असल्यानं पादरीला काही गडबड असल्याचा संशय आला. पादरीला जेवणानंतर ७०० नायरा म्हणजे जवळपास २.२० यूरो बिल दिलं गेलं. जे की दररोजच्या त्यांच्या जेवणाच्या खूप कमी होतं. पादरी म्हणाले, "मी जेव्हा बिलाबाबत शंका उपस्थित केली. तेव्हा अटेंडटनं सांगितलं की, आपण मटणाचा केवळ छोटाच तुकडा घेतला म्हणून पैसे कमी झाले. मी जेवलो तेव्हा मला आपण मानवी मांस खात असल्याची माहिती नव्हती.'
रेस्टॉरंटमध्ये छापा टाकल्यानंतर पोलिसांच्या टीमनं ग्रेनेड शिवाय अनेक घातक हत्यारंही हस्तगत केले. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केलीय.
एका स्थानिक नागरिकानुसार या घटनेमुळं आश्चर्य झालं नाही. कारण जेव्हा ते मार्केटमध्ये जायचे. तेव्हा रेस्टॉरंटमध्ये अजब घटना व्हायच्या. रेस्टॉरंटचे लोक कधीही स्वच्छ कपड्यात दिसायचे नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.