www.24taas.com, वृत्तसंस्था, वाशिंग्टन
खगोलशास्त्रज्ञांनी एक नवा शोध लावलाय. जवळपास 2600 प्रकाश वर्ष दूर पहिल्यांदा `सेल्स लेंसिंग वायनरी स्टार सिस्टम`मध्ये दिसायला उल्टा असा ग्रह शोधलाय.
वॉशिंग्टन विश्वविद्यालयाच्या खगोलशास्त्रज्ञ इरिक अगोल यांच्यासोबत काम करणारे डॉक्टरेट विद्यार्थी इथान क्रूजनं सांगितलं की वर्ष 1973च्या या आकलनानुसार या प्रकारची प्रणाली शक्य आहे.
संशोधकांनी सांगितलं की इतर मोठ्या शोधानंतर हा शोध ही महत्त्वाचा आणि अकस्मात लागला. `केप्लर स्पेस टेलीस्कोप`च्या डेटाचा वापर करत क्रूजनं ‘बाइनरी स्टार सिस्टम’ केओआई 3278 मध्ये असं काही पाहिलं ज्याचा काही अर्थ निघाला नाही. क्रूज म्हणाले, "मला आढळलं की हा ग्रह उल्टा दिसतोय."
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.