सूर्यमालेत दाखल झालाय नवीन सदस्य?

न्यू यॉर्क : विज्ञानात नेहमीच काही ना काही नवीन घडत असतं...

Updated: Jan 22, 2016, 03:47 PM IST
सूर्यमालेत दाखल झालाय नवीन सदस्य? title=

न्यू यॉर्क : विज्ञानात नेहमीच काही ना काही नवीन घडत असतं... उजेडात येत असतं... त्यासंबंधी अनेक दावे केले जातात. आता पुन्हा एकदा असाच एक नवीन दावा केला गेलाय. हा दावा आहे एका नवीन ग्रहाचा शोधाचा...

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया 'इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी'च्या काही संशोधकांचा दावा आहे. प्लुटो ग्रहाच्या पुढे असलेल्या एका अत्यंत गडद अंधारात हा ग्रह आहे, असा हा दावा आहे.

हा ग्रह बर्फाळ असून तो पृथ्वीच्या तुलनेत पाच ते दहा पट मोठा असल्याचेही संशोधकांचं म्हणणं आहे. असं असलं तरी या नव्या ग्रहाची छायाचित्रं मात्र अजून तरी उपलब्ध झालेली नाहीत.

गुरु किंवा शनी या ग्रहांच्या गुरुत्वीय बलामुळे हा नववा ग्रह अंधारात ढकलला गेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सध्यातरी या ग्रहाचे नामकरण 'प्लॅनेट नाईन' असं करण्यात आलंय. प्लुटोच्या ग्रह असण्याबाबतही अनेक मत-मतांतरे आहेत. तेव्हा आता या नव्या ग्रहाला सूर्यमालेतील नववा की दहावा ग्रह म्हणायचे यावरून भविष्यात वाद होऊ शकतो.